शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांच्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयाला आग लागली होती.
नाशिक महानगरपालिका कार्यालयाला लागलेली आग नियंत्रणात - nashik muncipal corporation office fire
12:55 January 22
12:08 January 22
नाशिक महानगरपालिका कार्यालयाला लागलेली आग नियंत्रणात
नाशिक -नाशिक महापालिकेतील गटनेता कार्यालयाला आग लागल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली होती. राजीव गांधी भवन येथील शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांच्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयाला ही आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार आग नियंत्रणात आली आहे.
दरम्यान आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक याठिकाणी दाखल झाले होते. काही वेळातच ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाला यश आले. मात्र यावेळी महापालिकेत मोठ्या प्रमाणात कर्मचारी असल्याने महापालिका क्षेत्रात गोंधळ उडाला होता. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र गटनेता कक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे समजत आहे. कार्यालयातील सोफा, खुर्च्या, टेबल यासह इतर सामानानचे नुकसान झाले.