महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Fire Break Out In Air Force Area: ओझर येथील हवाई दलाच्या परिसरात पेटला वनवा, हजारो एकरावरील वनसंपदेला धोका - आगीमुळे वनसंपदेला धोका

हवाई दलाच्या परिसरातील काही हेक्टरवर वनवा पेटल्यामुळे खळबळ उडाली. हवाई दलाच्या परिसरात वनवा पेटल्याने सगळीकडे आगीचे लोळ पसरले. घटनास्थळी दहा अग्निशामक गाड्या आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

Fire Break Out In Air Force Area
हवाई दलाच्या परिसरात पेटला वनवा

By

Published : May 7, 2022, 9:01 AM IST

नाशिक - ओझर शहराजवळ असलेल्या हवाई दलाच्या परिसरातील काही हेक्टरवर वनवा पेटल्यामुळे खळबळ उडाली. हवाई दलाच्या भागात वनवा पेटल्याने सगळीकडे आगीचे लोळ पसरले आहेत. घटनास्थळी दहा अग्निशामक गाड्याच्या मदतीने जवान आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते. अखेर ही आग आटोक्यात आणण्यास अग्निशमन दलास यश आले.

रात्री उशीरापर्यंत सुरू होते आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न -हवाई दलाच्या परिसरातील तसेच येवला, नाशिक आणि पिंपळगाव येथील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. परंतु हवेमुळे आग सगळीकडे पसरत होती. घटनास्थळी हवाई दलाचे अधिकारी तसेच एचएएलचे अधिकारी दाखल झाले. निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे, प्रांताधिकारी अर्चना पठारे आणि ओझर नगरपरिषदचे कर्मचारी लक्ष ठेऊन आहेत. अखेर काही तासांनी आग आटोक्यात आली आहे. मात्र ही आग कशामुळे लागली, याचे कारण अजून समजू शकले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details