महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Fire at Nashik : सातपूरमध्ये कंपनीला भीषण आग, लाखोंचा माल खाक - सातपूर औद्योगिक वसाहत

सातपूर औद्योगिक वसाहती मधील कॅपॅसिटरचे उत्पादन करणारी निलराज इंडस्ट्रीज या कंपनीला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. पहाटे ५ वाजेच्या दरम्यान सदर कंपनीला आग लागली.

कंपनीला भीषण आग
कंपनीला भीषण आग

By

Published : Feb 2, 2022, 11:18 AM IST

नाशिक - सातपूर औद्योगिक वसाहतीमधील कॅपॅसिटरचे उत्पादन करनारी निलराज इंडस्ट्री नावाच्या कंपनीला पहाटे भीषण आग लागली. पहाटे पावणे पाच वाजेपासून आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. नऊ बंबाच्या मदतीने आग विझविण्यात यश आले आहे. या आगीत लाखोंचा माल जळून खाक झाला आहे.

सातपूरमध्ये कंपनीला भीषण आग

सातपूर औद्योगिक वसाहती मधील कॅपॅसिटरचे उत्पादन करणारी निलराज इंडस्ट्रीज या कंपनीला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. पहाटे ५ वाजेच्या दरम्यान सदर कंपनीला आग लागली. ५ वाजून १० मिनिटांनी मनपा अग्निशमन दलास संपर्क केला असता अग्निशमन दलाच्या ३ बंब, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा १ बंब, एमआयडीसीचा १ बंबच्या साहाय्याने ९ वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवले. नंतर सदर ठिकाणी कुलिंगचे काम सुरू होते. आगीमध्ये पहिला मजला संपूर्ण जळून खाक झाला असून लाखो रुपयांचे कॅपॅसिटर बनवण्यास लागणारे कच्चा माल जळाला आहे. आग कोणत्या कारणाने लागली हे अद्याप समजले नाही. यावेळी नाशिक मनपा अग्निशमन केंद्र प्रमुख राजेंद्र बैरागी, पी.जी परदेशी, आर.ए लाड यांच्या एकूण २५ कर्मचारी आग विझवण्याचे कार्य करत होते.

कंपनीला भीषण आग

ABOUT THE AUTHOR

...view details