महाराष्ट्र

maharashtra

चोरी प्रकरणी राखीव उपनिरीक्षकावर गुन्हा; नाशिकच्या पोलीस अकॅडमीतील घटना

नाशिक शहरात सध्या चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली असतानाच आता थेट नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकॅडमीत पुन्हा एकदा चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यातील खळबळजनक बाब म्हणजे या घटनेप्रकरणी थेट राखीव उपनिरीक्षक कैलास तुकाराम सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

By

Published : Mar 16, 2021, 4:03 PM IST

Published : Mar 16, 2021, 4:03 PM IST

नाशिक
नाशिक

नाशिक- शहरात सर्वत्र चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले असताना पोलीस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत पुन्हा चोरीची घटना उघडकीस आली आहे. नाशिक शहरात सध्या चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली असतानाच आता थेट नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकॅडमीत पुन्हा एकदा चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यातील खळबळजनक बाब म्हणजे या घटनेप्रकरणी थेट राखीव उपनिरीक्षक कैलास तुकाराम सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

15 हजारांचे लोखंडी अँगल चोरल्याचा सोनवणे यांच्यावर आरोप...

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रस्त्यावर असलेल्या महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये काही दिवसांपूर्वीच चोरीची घटना घडली होती. त्यानंतर आता 14 मार्चला सायंकाळी अकादमीतील निर्माणाधीन इनडोअर फायरिंग बटच्या कामासाठी ठेवलेले 15 हजार 440 रुपयांचे लोखंडी अँगल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली होती. दरम्यान हे लोखंडी अँगल चोरून नेल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथील राखीव उपनिरीक्षक कैलास तुकाराम सोनवणे यांच्यावर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी कलम 379 अन्वये सोनवणे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास सहायक निरीक्षक सूर्यवंशी करत आहेत. मात्र, पोलीस अकादमीत झालेल्या चोरीप्रकरणी थेट राखीव उपनिरीक्षक गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने अकॅडमी परिसरात खळबळ उडाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details