महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक : हॉस्पिटलमध्ये अर्धनग्न आंदोलन केल्याप्रकरणी अखेर जितेंद्र भावे यांच्यावर गुन्हा दाखल - अखेर जितेंद्र भावे यांच्यावर गुन्हा दाखल

नाशिकच्या व्होकार्ट हॉस्पिटलमध्ये अर्धनग्न आंदोलन केल्याप्रकरणी अखेर आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ते जितेंद्र भावे यांच्यावर मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल 10 दिवसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. 25 तारखेला आंदोलन केल्यानंतर भावेना पोलिसांनी ताब्यात घेऊन समज देऊन करावाई न करताच सोडून दिले होते. मात्र आता हॉस्पिटल प्रशासन अधिकाऱ्याने तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

जितेंद्र भावे
जितेंद्र भावे

By

Published : Jun 4, 2021, 7:59 PM IST

नाशिक -नाशिकच्या व्होकार्ट हॉस्पिटलमध्ये अर्धनग्न आंदोलन केल्याप्रकरणी अखेर आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ते जितेंद्र भावे यांच्यावर मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल 10 दिवसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे डिपॉझिटचे पैसे परत मिळावे यासाठी रुग्णांचा मुलगा आणि सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांनी अर्धनग्न आंदोलन केले होते, या प्रकरणात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत ही कारवाई करण्यात आली आहे.

अखेर जितेंद्र भावे यांच्यावर गुन्हा दाखल

हॉस्पिटल प्रशासनाची मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार

नाशिकच्या व्होकार्ट हॉस्पिटलमध्ये अर्धनग्न आंदोलन केल्याप्रकरणी अखेर आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ते जितेंद्र भावे यांच्यावर मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल 10 दिवसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. 25 तारखेला आंदोलन केल्यानंतर भावेना पोलिसांनी ताब्यात घेऊन समज देऊन करावाई न करताच सोडून दिले होते. मात्र आता हॉस्पिटल प्रशासन अधिकाऱ्याने तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र आंदोलनाचा गुन्हा दाखल करण्यास तब्बल 10 दिवस का लागले असा प्रश्न सद्या उपस्थित केल्या जात आहे. यापूर्वीही सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

हेही वाचा-नाशिक: हॉस्पिटलमध्ये अर्धनग्न आंदोलन, जितेंद्र भावे यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details