नाशिक - जिल्ह्यातील नांदगाव मधील चांदोरे गावात वेळेस चारा छावणी सुरु न केल्याने 53 गाईंचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या गाईंच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गो-हत्येचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केली.
'त्या' 53 गाईंच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्र्यांवर गो-हत्येचा गुन्हा दाखल करा - राजू शेट्टी - शेतकरी
कांदा निर्यात अनुदान पुन्हा सुरू करावे, बांगलादेशने लावलेले निर्यात शुल्क माफ करावे, यासाठी राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. हे दोघे निर्णय तात्काळ घेतले नाही तर केंद्र आणि राज्याच्या मंत्र्यांना या भागात कांदे फेकून मारू, असा इशारा राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे.

जिल्हा बँकेची सक्तीची वसुली तात्काळ थाबवावी नाहीतर वसुलीला येणाऱ्या बँकेच्या अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांना पळवून लावू. गोरगरीब शेतकरी आधीच दुष्काळाने होरपळून गेला आहे, त्यात या बँकांकडून होणाऱया सक्तीची वसुली थांबवावी अन्यथा वसुली करायला येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पळवून लावू असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे.