महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये अशी झाली ऑक्सिजन गळती, बघा सीसीटीव्ही व्हिडिओ - ऑक्सिजन गळतीबाबत अतिरिक्त आयुक्तांवर गुन्हा दाखल करा

नाशिकच्या रुग्णालयात ऑक्सीजन गळती प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हा गुन्हा थेट महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रविण आष्टीकर आणि त्यांनी नेमलेला खाजगी ठेकेदार अशा दोघांवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्थायी समिती सभेत सदस्यांनी केली आहे.

Nashik Oxygen Leakage Case
नाशिक ऑक्सिजन गळती प्रकरण

By

Published : Apr 22, 2021, 10:03 PM IST

Updated : Apr 23, 2021, 4:11 PM IST

नाशिक - नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सीजन गळती होऊन कोविडवर उपचार घेणाऱ्या २४ निष्पाप रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. सुमारे अर्धा तास ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने मृत्यूचे तांडव झाले. या घटनेचे पडसाद देशभरात उमटले. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हा गुन्हा थेट महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रविण आष्टीकर आणि त्यांनी नेमलेला खाजगी ठेकेदार अशा दोघांवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्थायी समिती सभेत सदस्यांनी केली आहे. त्यांनतर सभापती गणेश गीते यांनी या दुर्घटना प्रकरणी महापालिकेच्या वतीने आयुक्त कैलास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समिती गठीत केल्याचं सांगितले आहे.

नाशिक ऑक्सिजन गळती प्रकरण

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ऑक्सिजन प्लांट महापालिकेच्या वतीने उभारण्यात यावा यासाठी स्थायी समिती सभेत चर्चा झाली होती. मनपाच्या हॉस्पिटलमध्ये होणारा ऑक्सिजन पुरवठा हा मनपाकडूनच व्हावा यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र स्थायी समितीला विश्वासात न घेता प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी हा पुरवठा खाजगी ठेकेदारामार्फत सुरू केल्याचं समोर आलं आहे. ज्या ठेकेदाराकडून ऑक्सिजन टाकीचे काम करण्यात आले त्याने वापरलेले मटेरियल उच्च दर्जाचे होते की नाही हे तपासण्याची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर यांचीच असल्याचा आरोप स्थायी समितीत करण्यात आला आहे.

त्याच बरोबर नाशिकरोडच्या बिटको हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या गैरसोयी बद्दल सदस्या सत्यभामा गाडेकर यांनी नाराजी व्यक्त केली असून डॉ. आवेश पलोड यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली गेली आहे. त्यामुळे उच्च स्तरीय समिती मध्ये अध्यक्ष असलेले राधाकृष्ण गमे हे प्रवीण आष्टीकर आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करणार का की त्यांना पाठीशी घालणार असा सवाल उपस्थित झाला आहे.

हेही वाचा - राज्यातील विद्यापिठांच्या सर्व परीक्षा ऑनलाईन होणार; उदय सामंत यांची घोषणा

Last Updated : Apr 23, 2021, 4:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details