नाशकात वेतन कपातीच्या कारणावरून पालिका कर्मचाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी - नाशिक पालिका कर्मचाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी
नाशिक महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांमध्ये आज फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. पालिकेच्या लेखा विभागात घडलेल्या या प्रकारानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला.
नाशिक - महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांमध्ये आज फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. पालिकेच्या लेखा विभागात घडलेल्या या प्रकारानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. अग्निशामक विभागात काम करणाऱ्या एका कर्मचार्याचा वेतनातून दरमहा 50 हजार रुपयांची अतिरिक्त कपात होत होती. ही कपात कोणत्या कारणावरून केली जाते याचा जाब हा कर्मचारी लेखा विभागात वारंवार करत होता. मात्र, लेखा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या कर्मचाऱ्यांचा समस्येवर तोडगा न निघाल्याने या कर्मचाऱ्याने आज लेखा विभागातील एका कर्मचाऱ्यास मारहाण केली.