दिंडोरी (नाशिक) - दिंडोरी तालुक्यात सध्या पावसाने आपले बस्तान थोड्या फार प्रमाणात बसविल्याने सर्वच धरणाच्या पातळीत समाधानकारक पाणीसाठा होऊ लागल्याने तालुक्यात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. इतर ठिकाणांच्या धरणाची स्थिती पाहता दिंडोरी तालुक्यातील सर्व धरणे पाण्याविना आहेत. परंतु सध्या पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने जवळ जवळ सर्वच धरणे ५० टक्क्यांच्या आसपास आली आहेत.
सध्या पालखेड धरण आघाडीवर असून ते ७५.२३ टक्के भरले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दिंडोरी तालुक्यातील सर्व धरणे ही पाणीसाठ्याच्या तुलनेत अत्यंत कमी प्रमाणात असल्यामुळे तालुक्यात व इतर तालुक्यासाठी चिंतेची बाब बनली आहेत.
आता मात्र पावसाने जोर धरल्यामुळे सर्व धरणांच्या पाणी पातळीत व साठ्यात वाढ होत असल्यामुळे ही समस्या दूर होईल असे चित्र निर्माण झाले आहे. दिंडोरी तालुक्यातील सर्व धरणावर इतर तालुक्याच्या शेतीची मदार अवलंबून असते. त्यामुळे या धरणाकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष केंद्रित असते.
दिंडोरी तालुक्यातील सर्व धरणाचा उपयुक्त पाणीसाठा पुढीलप्रमाणे -
१) पालखेड:-उपयुक्त पाणी साठा:-४७९.०० तर टक्केवारी:-७५.२३ टक्के
२) करजंवण:- 47.18 टक्के
३) वाघाड:- 53.11टक्के
४) ओझरखेड:- 47.53टक्के
५) पुणेगाव:-48.20 टक्के
६) तिसगाव:-17.2 टक्के
सध्या अशी टक्केवारी असल्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढत असल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.