दिंडोरी (नाशिक) : दिंडोरी तालुक्यातील खोरीपाडा गावात शेतकऱ्यांना खते आणि बियाणांचे वाटप करण्यात आले. विधानसभा उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते या खते आणि बियाणे वाटपाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी घरचेच सोयाबीन बियाणे वापरावे, असे आवाहनही आमदार झिरवाळ यांनी केले.
हेही वाचा...नाशकात १२ तासांत ५० कोरोनाबाधितांची भर, जिल्ह्याचा आकडा ६०० पार
कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर कृषी निविष्ठा विक्री केंद्रात होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांना बांधावरच खते आणि बियाणे उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी दिंडोरीतील अनेक विक्रेत्यांना आवाहन करण्यात आले होते. सदर आवाहनास प्रतिसाद देत मे. बोरा कृषी सेवा केंद्र वणीचे संचालक महेंद्रशेठ बोरा यांनी खोरीपाडा परिसरातील शेतकऱ्यांना आज (शनिवार) तब्बल 5 टन खतांचे वाटप करण्यात आले. आमदार नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी शेतकऱ्यांना सोयाबीनचे घरचे बियाणे असतील तर त्याची उगवण क्षमता कशी तपासायची, याबाबत प्रात्यक्षिके दाखवून बियाणांची गरज गावातच भागवणेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.