महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकच्या ओझरमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट्या ठार - Nashik Latest leopard accident news

पंचनाम्यानंतर बिबट्याला उत्तरीय तपासणीसाठी चांदवड वनपरिक्षेत्र कार्यालयात नेण्यात आले आहे. वर्षभरात नाशिक विभागात बिबट्याच्या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर, गेल्या वर्षभरात 14 बिबट्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट्या ठार
अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट्या ठार

By

Published : Jan 19, 2021, 5:02 PM IST

नाशिक -ओझर येथील एचएएलसमोरील मुंबई-आग्रा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक वर्ष वयाची मादी बिबट्या ठार झाली आहे. चांदवड विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पवार यांनी ही माहिती दिली आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट्या ठार

हेही वाचा -मुंबईत लसीकरणाला सुरळीत सुरुवात, कोविन अ‌ॅपमध्येही सुधारणा

एका वर्षात 20 बिबट्यांचा मृत्यू

पंचनाम्यानंतर बिबट्याला उत्तरीय तपासणीसाठी चांदवड वनपरिक्षेत्र कार्यालयात नेण्यात आले आहे. वर्षभरात नाशिक विभागात बिबट्याच्या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर, गेल्या वर्षभरात 14 बिबट्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. धक्कादायक म्हणजे नाशिक विभागात जानेवारी 2020 ते 2021 या कालावधीत विविध कारणांनी 20 बिबट्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट्या ठार

हेही वाचा -भुईंज खुनातील आणखी तिघे गजाआड, व्यापाऱ्याची हत्या करून मृतदेह जाळला

ABOUT THE AUTHOR

...view details