महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nashik Crime : वडिलांसह दोन मुलांची आत्महत्या! पोलिसांकडून 21 सावकारांविरोधात गुन्हा दाखल; 10 जणांना अटक - सातपूर परिसरातील राधाकृष्ण नगर

सातपूर परिसरातील राधाकृष्ण नगर येथील फळ व्यवसाय करणाऱ्या शिरोडे कुटुंबातील वडील व दोन तरुण मुलांनी एकाच वेळी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना (दि. 29 जानेवारी)रोजी घडली आहे. सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली असून, याप्रकरणी आता येथील 21 खाजगी सावकारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील 10 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

Nashik Crime
फाईल फोटो

By

Published : Jan 30, 2023, 3:26 PM IST

नाशिक : नाशिकच्या सातपूर परिसरातील अशोक नगर बस स्थानकाजवळ फळ विक्री व्यवसाय करणारे दीपक सुपडू शिरोडे (वय, 55), मोठा मुलगा प्रसाद शिरोडे (वय, 25) आणि लहान मुलगा राकेश शिरोडे (वय, 23 ) यांनी रविवार (दि. 29)रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास आपल्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असता पोलिसांना आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली एक चिठ्ठी मिळाली होती. या चिठ्ठीमध्ये खासगी सावकारांच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख केला होता. तसेच, या चिठ्ठीमध्ये जवळपास 21 खासगी सावकारांची नावे लिहून ठेवण्यात आलेले पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यातील दहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.


या सावकारांचा उल्लेख :चिठ्ठीत केलेल्या उल्लेखावरून आणि प्रतिभा दीपक शिरोडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित एम. आर. धामणे, राजाराम दा. काळे, मुकेश भी. लोहार, भास्कर सोनवणे, मुकेश सोनवणे, शांताराम नागरे रा. पिंपळगाव, संजू पाटील रा. शिवाजीनगर, शेखर पवार रा. शिवाजीनगर, प्रकाश व्ही. गोन्हे, नलिनी शेलार, बाविस्कर रा. अशोकनगर, कैलास गोराणे, भूषण चौधरी, गरीब नवाज, भरत वंजी पाटील, किरण बोडके, गिरीश खटाडे, मुरली पाटील, अरुणा पाटील, आकाश इंगळे, शरद पिंगळे यांच्या विरोधात कर्जाची रक्कम वसुलीसाठी मयत यांच्या घरी आणि दुकानावर येऊन समक्ष तसेच फोनवरून शिवीगाळ आणि धमकी देत छळवणूक करीत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावकारांचा जाच : काही दिवसांपूर्वी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गौरव आणि नेहा जगताप या दांपत्याने पैसे वसुलीच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या करीत आपली जीवनयात्रा संपवली होती. आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमुळे या घटनेचा खुलासा झाला. त्यानुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात युनूस मणियार आणि मयूर बैरागी या दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पतीकडून 50 हजार रुपये घेतले : दुसऱ्या घटनेत तपंचवटी परिसरातील एका कर्जदाराने खासगी सावकाराकडून साडेचार लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्यावरील दहा टक्के दराने व्याजाचे असे 26 लाख 98 हजार रुपये परत घेण्यासाठी आरोपीने फिर्यादी यांच्या पतीला इनोव्हा कारमध्ये बळजबरीने बसवून घेत त्याला जीवे मारण्याची धमकी देत पिडीतेच्या पतीकडून 50 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर करून घेतले होते. आणि त्यानंतर थेट घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याने पंचवटी पोलीस ठाण्यात खासगी सावकार चेतन प्रकाश बोरकर 32 रा. तांबोळी नगर हिरावाडी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुलीला वारंवार फोन करून धमकी दिली : तिसऱ्या घटनेत मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पीडित सुरेश पोराला पुजारी यांनी संशयित खासगी सावकार विजय शंकरराव देशमुख रा गोविंद नगर यांच्याकडून जानेवारी 2007 मध्ये पाच टक्के व्याजाने नऊ लाख रुपये घेतले होते. या नऊ लाखांच्या मोबदल्यात 2007 ते 2022 पर्यंत वेळोवेळी व्याजापोटी 44 लाख नव्वद हजार रुपये रोख आणि सहा लाख रुपये बँकेतून ट्रान्सफर करून असे 50 लाख 90 हजार रुपये दिले होते. तरी देखील सावकाराने 20 लाख रुपये बाकी असल्याचे सांगत पुजारी यांना आणि त्यांच्या मुलीला वारंवार फोन करून शिवीगाळ करीत जिवे मारण्याच्या धमक्या देत असल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा :जम्मू-काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेचा समारोप, द्वेषाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी ही यात्रा काढल्याचे खरगेंचे उच्चार

ABOUT THE AUTHOR

...view details