नाशिक- राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर होणारी वाहनांची गर्दी लक्षात घेता केंद्र सरकारने फास्टॅग सुविधा सुरू केली आहे. वाहनांवर फास्टॅग असल्यास काही वेळातच वाहने टोल नाका पास करू शकतात. मात्र, या फास्टॅग सिस्टीममध्ये स्कॅानिंग करताना तांत्रिक अडचणी येत होत्या. यावर उपाय म्हणून आता फास्टॅग गनचा वापर करण्यात येणार आहे.
आता फास्टॅग गननेही लवकरच होणार वाहन स्कॅन - Fast Tag Gun Information
बऱ्याच वाहनांच्या काचेवर फास्टॅग मधोमध लावलेला नसतो. त्यामुळे स्कॅनिंग मशीनमध्ये स्कॅन होण्यास अडचणी निर्माण होतात. अशात टोल नाक्यावर हँडलीग फास्टॅग गन ठेवण्यात आली आहे. या आधुनिक फास्टॅग गनच्या माध्यमातून काही सेकंदात वाहनांवरील फास्टॅग स्कॅन केला जातो.
बऱ्याच वाहनांच्या काचेवर फास्टॅग मधोमध लावलेला नसतो. त्यामुळे स्कॅनिंग मशीनमध्ये स्कॅन होण्यास अडचणी निर्माण होतात. अशात टोल नाक्यावर हँडलीग फास्टॅग गन ठेवण्यात आली आहे. या आधुनिक फास्टॅग गनच्या माध्यमातून काही सेकंदात वाहनांवरील फास्टॅग स्कॅन केला जातो. तसेच, फास्टॅग गणमध्ये वाहनधारकांच्या फास्टॅग अकाउंटमध्ये पैसे आहे की नाही याची देखील माहिती मिळते. त्याचबरोबर, टोल भरल्यानंतर वाहनधारकांच्या मोबाइलवर तात्काळ मॅसेज देखील जातो.
हेही वाचा-नाशिकमधील घाऊक बाजारात कांद्याचे भाव घसरले; शेतकरी चिंताग्रस्त