महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशकात शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या - अवनखेड येथे शेतकऱ्याचीआत्महत्या

अवनखेड येथील शेतकरी शंकर मुरलीधर वसाळ (वय 55) यांनी गुरुवारी दुपारी 4:30 च्या सुमारास झाडावर दोरीने गळफास घेत जीवनयात्रा संपवली.

शेतकरी शंकर मुरलीधर वसाळ

By

Published : Nov 14, 2019, 11:22 PM IST

नाशिक -राज्यात शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नाहीत. तालुक्यातील अवनखेड येथील शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. दिंडोरी तालुक्यातील या महिन्यातील ही तिसरी तर या वर्षातील 12 वी शेतकरी आत्महत्या आहे.


अवनखेड येथील शेतकरी शंकर मुरलीधर वसाळ (वय 55) यांनी गुरुवारी दुपारी 4:30 च्या सुमारास झाडावर दोरीने गळफास घेत जीवनयात्रा संपवली. वसाळ यांच्यावर सोसायटी व एक राष्ट्रीयीकृत बँकेचे कर्ज असल्याची माहिती आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,दोन मुली असा परिवार आहे. पुढील तपास दिंडोरी पोलीस व्ही. टी. जाधव करत आहेत.


सततची नापिकी त्यातच यावर्षी पुन्हा निसर्गाची अवकृपा यामुळे हातात आलेले पीक गेले आहे. दिवसेंदिवस शेतीची परिस्थिती बिकट होत आहे. हवामान बदल हे कारण तर आहेच, पण मागच्या काही वर्षांत आधारभूत किमतीपेक्षा शेतमालाचे बाजारभाव कमी झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details