नाशिक - दिंडोरी तालुक्यातील वणी आठवडी बाजारात फक्त ५० पैसे किंमतीत अर्धा किलो फ्लॉवरची विक्री करण्यात येत आहे. वणीच्या आठवडी बाजारात दिंडोरी, सुरगाणा, कळवण, निफाड, चांदवड व मालेगाव तालुक्यातील अनेक व्यापारी व शेतकरी शेतमाल विक्रीसाठी येतात. चांदवड तालुक्यातील समाधान रिकबे या शेतकऱ्यांनी फुलकोबी (फ्लॉवर) बाजारात विक्रीसाठी आणले होते. यावेळी त्यांना अत्यंत कमी भाव मिळाला. यामध्ये लागवडीचा खर्च देखील निघत नसल्याचे त्यांनी सांगितले.
या वर्षी हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेल्याने त्यांनी कमी भरून काढण्यासाठी या पिकाची लागवड केली. मात्र, आता याचे भाव पडल्याने शेतकऱ्याचे किमान मूल्य देखील निघत नसल्याने बळीराजावर संकट ओढावले आहे. बाजारात पिकाला भाव मिळच नसल्याने शेतकऱ्यांवर 25 पैसे फ्लॉवर विकण्याची वेळ आली आहे.
शेतकरी - अशोक गोतरणे
खर्च - ४० ते ५० हजार
उत्पादन - फ्लॉवर (फुलकोबी)