महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक : शेतकऱ्यांचा मोर्चा कसारा घाटातून मुंबईच्या दिशेने रवाना - nashik farmer march news

अखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा नाशिकच्या कसारा घाट सोडून मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले असून या मोर्चामुळे नाशिक-मुंबई महामार्गावरील एकतर्फी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

farmers march start from kasara ghat towards mumbai
नाशिक : शेतकऱ्यांचा मोर्चा कसारा घाटातून मुंबईच्या दिशेने रवाना

By

Published : Jan 24, 2021, 3:05 PM IST

नाशिक- केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात नाशिकहुन मुंबईच्या दिशेने निघालेला किसान सभेचा मोर्चा नाशिकच्या कसारा घाट सोडून मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले असून या मोर्चामुळे नाशिक-मुंबई महामार्गावरील एकतर्फी वाहतूक बंद करण्यात आली आहे. राजभवनाच्या दिशेन निघालेले लाल वादळ आज रात्री उशिरा राजधानी मुंबईत धडकणार आहे.

शेतकरी मोर्चा

संध्याकाळी मुंबईत पोहोचणार -

देशभर २३ ते २६ जानेवारी या काळात सर्व राज्यांच्या राज्यपाल भवनांवर आंदोलन करण्याची हाक अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने दिली आहे. मुंबई येथील आझाद मैदान येथे या आवाहनानुसार महामुक्काम सत्याग्रहात सहभागी होण्यासाठी किसान सभेचा हा वाहन मोर्चा संध्याकाळी मुंबईत पोहोचणार आहे. सोमवारी आझाद मैदान येथे सकाळी ११ वाजता सभा होईल. महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील सर्व पक्ष, डावे व लोकशाही पक्ष यांच्या प्रमुख नेत्यांसोबत अखिल भारतीय किसान सभेचे प्रमुख नेते माजी खासदार हनन मोल्ला या सभेस संबोधित करतील. सभेनंतर राज भवनाकडे दिशेने रवाना होतील. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यपालांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करतील. सोबतच प्रजासत्ताक दिनी सकाळी मुंबईच्या आझाद मैदानावर राष्ट्रध्वज फडकवून या मोर्चाची सांगता होणार आहे.

या आहेत प्रमुख मागण्या -

शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द करा, शेतीमालाला आधार भावाचे संरक्षण देणारा कायदा करा, वीज विधेयक मागे घ्या, कामगार संहितेमधील कामगारविरोधी बदल रद्द करा, वनजमीन तथा देवस्थान, गायरान, आकारीपड, बेनामी व वरकस जमीन कसणारांच्या नावे करा आणि महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू करून सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्या, या मागण्या आंदोलनात करण्यात येणार आहेत.

हेही वाचा - दिल्लीत आकाशवाणी भवनला आग, अग्निशामक दल घटनास्थळी दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details