नाशिक - कांद्याच्या भावात कोणत्याही प्रकारची वाढ झाली नसल्याने येवला येथील शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे. या शेतकरी संतप्त भावना व्यक्त करत कांद्याचा लिलावही बंदी पाडला आहे.
कांद्याच्या दरात वाढ करा; येवल्यात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
शासनाने कांद्यावरील निर्यातबंदी उठवली आहे. यासंदर्भात त्यांनी घोषणा देखील केली आहे. मात्र, कांद्यावरील निर्यात बंदी उठवल्याचे पत्र बाजार समिती आणि व्यापाऱ्यांना मिळाले नाही. कांद्याच्या भावात कोणत्याही प्रकारची वाढ झालेले नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
शासनाने कांद्यावरील निर्यातबंदी उठवली आहे. यासंदर्भात त्यांनी घोषणा देखील केली आहे. मात्र, कांद्यावरील निर्यात बंदी उठवल्याचे पत्र बाजार समिती आणि व्यापाऱ्यांना मिळाले नाही. कांद्याच्या भावात कोणत्याही प्रकारची वाढ झालेले नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. यामुळे त्यांनी रस्त्यावर उतरुन रास्ता रोको आंदोलन केले. तसेच कांद्याच्या भावात वाढ करावी आणि निर्यात बंदी उठवल्याचे पत्र बाजार समिती व व्यापाऱ्यांना द्यावे, अशी मागणी या वेळी संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा -विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत महानगरांमध्ये ५३ रुपयांनी कपात