नाशिक - गेले काही दिवस गायब असलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. नाशिकमध्येही विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. येवला तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसला आहे. नगरसुल गावात शेकडो एकरवरील बाजरी पावसामुळे सपाट झाली आहे. गावातील शेतकरी दामोदर गाडेकर यांनी 1 एकर बाजरी पिकावर रोटावेटर फिरवले आहे. गाडेकर यांच्या प्रमाणेच अनेक शेतकऱ्यांवर ही परिस्थिती आली आहे.
पावसामुळे बाजरी पिकावर रोटावेटर फिरवण्याची वेळ - नाशिक बाजरी पीक न्यूज
येवला तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. नगरसुल गावात शेकडो एकरवरील बाजरी पावसामुळे सपाट झाली आहे. गावातील शेतकरी दामोदर गाडेकर यांनी 1 एकर बाजरी पिकावर रोटावेटर फिरवले आहे. गाडेकर यांच्या प्रमाणेच अनेक शेतकऱ्यांवर ही परिस्थिती आली आहे.
बाजरी पीक
नगरसुल गावात बाजरीचे उत्पन्न घेतले जाते. यावर्षी देखील शेतकऱ्यांनी बाजरीची पेरणी केली आहे. सध्या बाजरी पिकाला कणीस लागण्याची वेळ आहे. मात्र, याच काळात जोरदार पाऊस होत असल्याने बाजरीचे उभे पीक सपाट झाले आहे. परिणामी आता शेतकऱ्यांनी पिकांवर रोटावेटर फिरवण्यास सुरुवात केली आहे. कष्टाने पिकवलेल्या बाजरीच्या पिकावर रोटावेटर फिरवण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.