येवला (नाशिक) -नाशिक जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असल्याने सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेत माल विक्री करता येत नसल्याने त्वरित बाजार समित्या सुरू कराव्या, अशी मागणी येवल्यातील शेतकरी करत आहे.
बाजार समित्या सुरू करा-
नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समिती सुरु करा; येवल्यातील शेतकऱ्यांची मागणी - नाशिक कांदा उत्पादक शेतकरी
राज्यात संचारबंदी लागू झाल्याने नाशिक जिल्ह्यामध्ये बारा दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात आला. या लॉकडाऊनमध्ये सर्व कृषी बाजार समितीमधील कांद्याचे व भुसार धान्य लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुसकान होत आहे.त्यामुळे कांद्यासह इतर धान्य लिलाव सुरू करावे, अशी मागणी येवल्यातील शेतकरी करत आहे.

सध्या उन्हाळी कांदा साठवणुकीचा कालावधी चालू असल्यामुळे तसेच जून महिना जवळ आल्याने मशागतीचे कामे सुरू होणार आहे. अशावेळी बाजार समिती सुरू झाल्या तर कांदा विकता येईल व त्यातुन शेती करीता भांडवल निर्माण होऊन मशागतीचे काम करता येईल. मात्र बाजार समिती बंद असल्याने कोणत्याही प्रकारचा शेतीमाल विक्री होत नसल्याने शेती मशागतीसाठी भांडवल कसे उभे करावे? असा प्रश्न येवल्यातील शेतकऱ्यांना पडला आहे.