महाराष्ट्र

maharashtra

कांद्याला हमीभाव द्या; मनमाडमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको

निर्यातबंदी उठवण्याची घोषणा करून देखील कांद्याला चांगला भाव मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारातील लिलाव बंद पाडला.

By

Published : Mar 2, 2020, 4:08 PM IST

Published : Mar 2, 2020, 4:08 PM IST

Updated : Mar 2, 2020, 7:33 PM IST

ONION NEWS NASHIK
कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी केला रस्ता रोको

नाशिक- मनमाड बाजार समितीत आज(सोमवार) कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याचे पाहून शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यांनी लिलाव बंद पाडून जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, रविवारी कांद्याला चांगला हमीभाव मिळावा अशी मागणी करत आधी बाजार समितीच्या कार्यालयासमोर आणि नंतर मालेगाव चौफुली येथे रास्ता रोको करत जोरदार निदर्शने केली.

कांद्याला हमीभाव द्या; मनमाडमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको

निर्यातबंदी उठवण्याची घोषणा करून देखील कांद्याला चांगला भाव मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारातील लिलाव बंद पाडला. तसेच संतप्त शेतकऱयांनी पुणे इंदूर महामार्गावरील मालेगाव चौफुली येथे रस्ता रोको आंदोलन केले. मनमाड शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी घटनास्थळी धाव घेऊन शेतकऱ्यांच्या भावना समजावून घेत त्यांची समजूत काढली. त्यानंतर बाजार समितीचे सचिव रमेश कराड यांना मागण्यांचे लेखी पत्र देऊन त्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहचवू, असे लेखी आश्वासनाचे पत्र देऊन आंदोलन मागे घेण्यात आले.

शेतकरी संतप्त झाले असल्याचे बघून व्यापारी व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने तात्काळ पोलिसांना बोलावून वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, शेतकरी मोठ्या प्रमाणावर संतप्त झाले होते .त्यामुळे त्यांनी लिलाव बंद ठेवत निदर्शने सुरूच ठेवली. शेवटी बाजार समितीचे सचिव रमेश कराड यांनी मध्यस्थी केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

Last Updated : Mar 2, 2020, 7:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details