मालेगाव - मालेगाव तालुक्यातील दुष्काळाची परिस्थिती कायम असताना टिंगरी येथील भटू निंबा पवार या शेतकऱ्याने रात्री आपली जीवनयात्रा संपवली. या शेतकऱ्याने आपल्या घराजवळ असलेल्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. यंदाची दुष्काळी परिस्थिती, सततची नापिकी व कर्जबाजारीपणा या नैराश्येतून भटू पवार यांनी आत्महत्याचे पाऊल उचलल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
दुष्काळी परिस्थितीला कंटाळून टिंगरी येथे शेतकऱ्याची आत्महत्या - वडनेर पोलीस ठाणे
यंदाची दुष्काळी परिस्थिती, सततची नापिकी व कर्जबाजारीपणा या नैराश्येतून भटू पवार यांनी आत्महत्याचे पाऊल उचलल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
![दुष्काळी परिस्थितीला कंटाळून टिंगरी येथे शेतकऱ्याची आत्महत्या](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3533537-630-3533537-1560264546084.jpg)
शेतकरी भटू पवार
त्यांच्या नावे बँकेत सात लाखांचे कर्ज आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनी पवार यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. जिल्हाधिकारी यांना प्राथमिक अहवाल पाठविण्यात आला असून वडनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या शेतकऱ्याच्या आत्महत्येने मालेगांव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे