महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशकात कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - शेतकरी

नांदगाव तालुक्यातील नारायणगाव येथील शेतकरी किरण उगले याने आज(सोमवारी) सकाळी शेतात विजेच्या खांबाला असलेल्या टेंशन तारेला गळफास घेऊन आत्महत्या केली. किरण याचे गेल्या २ वर्षांपासून शेतीत मोठे नुकसान होत होते. तसेच त्याच्यावर युनियन बँकेचे वैयक्तिक कर्ज असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.

शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या

By

Published : Nov 4, 2019, 2:21 PM IST

नाशिक - शेतात होणाऱ्या सततच्या नुकसानीला तसेच कर्जाला कंटाळून नांदगाव तालुक्यातील नारायणगाव येथील दत्तू उगले (३०) या शेतकऱ्याने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्यावर युनियन बँकेचे तसेच वैयक्तिक कर्ज असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. एका आठवड्यातील शेतकरी आत्महत्येची ही चौथी घटना आहे.

शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या

नांदगाव तालुक्यातील नारायणगाव येथील शेतकरी किरण उगले याने आज(सोमवारी) सकाळी शेतात विजेच्या खांबाला असलेल्या टेंशन तारेला गळफास घेऊन आत्महत्या केली. किरण याचे गेल्या २ वर्षांपासून शेतीत मोठे नुकसान होत होते. तसेच त्याच्यावर युनियन बँकेचे वैयक्तिक कर्ज असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. किरण याची आत्महत्या ही जिल्ह्यातील चौथी आत्महत्या आहे. शासनाने आतातरी दुष्काळग्रस्त भागात शासकीय यंत्रणा पाठवून त्वरित पंचनामे करावे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

हेही वाचा - नाशिकवर पसरली धुक्याची चादर; गुलाबी थंडीची चाहूल

नाशिक जिल्ह्यात एका आठवड्यातील ही चौथी शेतकरी आत्महत्या असून प्रशासनाने आतातरी दखल घेऊन शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी. तसेच नुकसान झालेल्या शेतकरी बांधवाच्या नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

हेही वाचा -दिंडोरी तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटूबांला आठवलेंकडून एक लाखाची मदत

ABOUT THE AUTHOR

...view details