नाशिक - सिन्नर तालुक्यातील महळ बुद्रुक येथील शेतकऱ्यांने कर्ज फेडता न आल्याने आत्महत्या केली. संतोष कारभारी शेळके असे शेतकऱ्यांचे नाव आहे. संतोष शेळके यांनी रविवारी सकाळी शेतातील विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली.
सिन्नरमध्ये कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - suicide
संतोष कारभारी शेळके (वय ४२) यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडता न आल्याने त्यांनी रविवारी (ता. १४) सकाळी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.
संतोष कारभारी शेळके
संतोष कारभारी शेळके (वय ४२) यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडता न आल्याने त्यांनी रविवारी (ता. १४) सकाळी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. एक महिन्यापूर्वी त्यांनी शेतातील डाळिंबाचा बाग काढून टाकली होती. तेंव्हापासून शेळके हे तणावाखाली होते.
शेळके यांनी शेतीसाठी सोसायटीचे कर्ज घेतले होते. तसेच त्यांनी लोकांकडून उसने पैसे घेतले होते. याबाबत वावी पोलीस तपास घेत आहे.