नाशिक -लॉकडाऊन काळात कष्टाने पिकविलेल्या कांदा पिकाला योग्य भाव नाही. तसेच हाताला काम न मिळाल्याने नाशिकच्या कळवण तालुक्यातील अल्पभूधारक तरुण शेतकरी प्रकाश शिवाजी निकम (३८) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रवळजी शिवारातील धाकल दरी भागात घडली.
नाशकात कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या - nashik corona update news
मृत प्रकाश निकम यांचे कळवण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी, असा परिवार आहे. या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या घटनेची मिळालेली माहिती अशी, की मृत प्रकाश निकम हे अल्पभूधारक शेतकरी असून उपजीविका भागविण्यासाठी शेती व्यतिरिक्त मिळेल ते काम करत असत. नातेवाईकांच्या सांगण्यावरून निकम यांनी लॉकडाऊन काळात पिकविलेल्या कांदा पिकाला योग्य दर मिळाला नाही व लॉकडाऊन काळात हाताला कामही मिळाले नाही. त्यामुळे ते आर्थिक विवंचनेत होते. तसेच त्यांनी महाराष्ट्र बँकेचे पीककर्ज तसेच खासगी फायनान्स कंपनीचे कर्ज घेतले असल्याचे समजते. त्यांनी रवळजी शिवारातील धाकल दरी भागातील स्वतःच्या शेतातील सागाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. मृत प्रकाश निकम यांचे कळवण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी, असा परिवार आहे. याप्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.