येवला : पिकाचे महत्व व मागणी लक्षात घेवून शेती केली तर शेतीत तोटा होत नाही. हे येवला तालुक्यातील एका शेतकऱ्याने सिद्ध केले आहे. ममदापूर येथील शेतकरी जनार्दन उगले यांनी मिरची पिकाचे महत्व व मागणी लक्षात घेतली. त्याने शेततळ्याच्या पाण्यावर एक एकर शेतीत मल्चिंग पद्धतीने कलिंगड पिकात तिखट अन् फिकी या दोन प्रकारच्या मिरचीची लागवड केली आहे. कांदा बाजार भावातील मंदी लक्षात घेऊन येवला तालुक्यातील ममदापूर येथील शेतकऱ्याने मिरची व कलिंगडाचे कलिंगडाची आंतरपीक शेती करून शेतकऱ्याने आर्थिक प्रगतीचा मार्ग शोधला आहे.
बाजारात मिरचीला चांगली मागणी :पिकाची योग्य निगा त्यांनी राखली आहे. मिरचीला फुले, कळी चांगल्या प्रमाणात आहे. मिरची तोडणीला देखील आली आहे. बाजारात मिरचीला चांगली मागणी आहे. फिकी मिरचीला 30 रुपये किलो तर तिखट मिरचीला 50-55 किलो इतका भाव मिळत आहे. अंतरपीक म्हणून घेतलेले कलिंगड देखील तयार झाले आहे. एकीकडे पारंपरिक पिकांची लागवड करण्याची धूम चालू असतांना अभ्यासू शेतकरी जनार्दन उगले यांनी मिरची आणि कलिंगड पिकाची लागवड केली आहे. या शेतकऱ्याला दोन ते अडीच लाख रुपये खर्च आला आहे. यातून त्याला चार ते साडेचार लाख रुपये मिरचीतून उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. कलिंगडातूनदेखील लाख रुपये उत्पन्न मिळेल.