नाशिक- लोकांचे जीव वाचवणे हे राज्य शासनाचे प्राधान्य आहे. उद्या आपल्यासमोर लोक उपचाराअभावी मृत्यूमुखी पडत असतील तर ही सत्ता व पदे काय कामाचे. विकास नंतरही होईल. पण, सध्या जीव महत्वाचा असे सांगत कृषी मंत्री दादा भुसे यांनी लोकांचा जीव वाचवण्यासाठी टाळेबंदी हा शेवटचा पर्याय असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.
बेड, रेमडेसिवीर व ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचे नाकारता येत
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि. 12 एप्रिल) मालेगाव व नाशिक जिल्ह्याचा कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात टाळेबंदीबाबत विचारले असता त्यांनी ही भूमिका मांडली आहे. राज्यात कोरोनाचा कहर सुरू असून बेड, रेमडेसिवीर व ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचे नाकारता येत नाही. राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्त वाढत आहेत. त्यामुळे टाळेबंदी हाच शेवटचा पर्याय असल्याचे मंत्री भुसे म्हणाले.
आपल्या डोळ्यासमोर माणस कशी मरू द्यायची
रूग्ण वाढिची परिस्थिती अशीच सुरू राहिल्यास रुग्ण ठेवायला देखील जागा मिळणार नाही. आपल्या डोळ्यासमोर माणसे कशी मरू द्यायची. ही साखळी तोडायची असेल तर टाळेबंदी हा शेवटचा पर्याय आहे. परिस्थिती गंभीर असून बंधने पाळले नाही तर सर्वकाही हाताबाहेर जाईल. लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे. मात्र, आता प्राण वाचवणे सगळ्यांत महत्वाचे आहे. असे सांगत 15 दिवस कडक निर्बंध पाळण्याची आवश्यकता असल्याचे मंत्री भुस यांनी टाळेबंदीबाबात स्पष्ट संकेत दिले आहेत.
बाजार समित्यांमध्ये गर्दी चिंतेचा विषय
राज्यातील बाजार समितीमध्ये होणारी गर्दी हा चिंतेचा विषय असून गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. कृषी माल विकण्यासाठी सूट देण्यात आली तरी कोणीही नियम मोडू नये. कोरोना नियम मोडणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देखील मंत्री भुसे यांनी यावेळी दिला आहे.
हेही वाचा -नाशिक महानगरपालिकेला मिळणार 20 हजार रेमडेसिवीर
हेही वाचा -नाशकात 'रेमडेसिवीर'चा काळाबाजार करणाऱ्या डॉक्टरचा पर्दाफाश