नाशिक -योग्य भाव मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्याने मेथीच्या शेतामध्ये जनावरे चरण्यासाठी सोडून दिल्याची घटना येवला तालुक्यातील राजापूर येथे घडली. अनिल अलगट, असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
भाव मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्याने मेथीच्या शेतात सोडली जनावरे; नाशकतील घटना - राजापूर गावात मेथी शेतात सोडली जनावरे
कांद्याच्या रोपांचे नूकसान झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी मेथीच्या भाजीला प्राधान्य दिले होते. मात्र, बाजारात मोठ्या प्रमाणावर मेथीची आवक झाल्याने भाजीला कवडीमोल भाव मिळत आहे. दहा रुपयांना पाच ते सहा जुड्या देऊनही हवी तशी विक्री होत नसल्याने अनेक वेळा भाजी फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे.

हेही वाचा -नाशिकच्या आदिवासीबहुल भागात स्ट्रॉबेरी बहरली; भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतातूर
कांद्याच्या रोपांचे नूकसान झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी मेथीच्या भाजीला प्रधान्य दिले होते. मात्र, बाजारात मोठ्या प्रमाणावर मेथीची आवक झाल्याने भाजीला कवडीमोल भावात मिळत आहे. दहा रुपयांना पाच ते सहा जुड्या देऊनही हवी तशी विक्री होत नसल्याने अनेक वेळा भाजी फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. बियाण्यासाठी केलला खर्चदेखील वसूल झाला नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. सध्या ढगाळ वातावरणामुळे आहे ते पीकही पिवळे होऊन त्यावर मावा व करपा रोगाचा प्रादुर्भाव होत आहे.