नाशिक - जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील बाडगीचापाडा येथील एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले. शेतात काम करत असताना दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिंडोरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी - दिंडोरी बिबट्या हल्ला
शेतकरी सीताराम अमृता कनोजे (वय ६५ हे रविवारी (१० मे) बाडगीचापाडा शिवारातील आपल्या शेतात काम करत होते. त्यावेळी दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. मात्र, या वयोवृद्ध शेतकऱ्याने प्रतिकार केला. तरीही बिबट्याच्या हल्ल्यात कनोजे यांच्या कपाळावर डाव्या भुवईच्यावरती गंभीर दुखापत झाली आहे.
![दिंडोरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी dindori nashik latest news दिंडोरी नाशिक लेटेस्ट न्युज दिंडोरी बिबट्या हल्ला dindori leopard attack](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7149531-644-7149531-1589180052352.jpg)
शेतकरी सीताराम अमृता कनोजे (वय ६५ हे रविवारी (१० मे) बाडगीचापाडा शिवारातील आपल्या शेतात काम करत होते. त्यावेळी दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. मात्र, या वयोवृद्ध शेतकऱ्याने प्रतिकार केला. तरीही बिबट्याच्या हल्ल्यात कनोजे यांच्या कपाळावर डाव्या भुवईच्यावरती गंभीर दुखापत झाली आहे. कनोजे यांनी आरडा ओरड करीत परिसरात काम करणाऱ्या इतर शेतकऱ्यांना मदतीसाठी हाका मारल्या. परिसरातील इतर शेतकऱ्यांनी कनोजे यांच्या शेताकडे धाव घेत बिबट्याला पिटाळून लावले. तसेच तातडीने कनोजे यांना ननाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर उपचार केले असून त्यांच्या भुवईवर सहा टाके पडले आहेत.