कोबी पिकावर नांगर फिरविताना शेतकरी नाशिक: शेतकरी अंबादास खैरे यांनी कोबी लागवडीसाठी एकरी ५० हजार रुपये खर्च केला आहे. पाच एकर कोबीच्या लागवडीसाठी त्यांनी 2 लाख 50 हजार रुपये खर्च केले आहेत. मात्र कोबी पिकाला केवळ एक रुपये किलो भाव मिळत असल्याने त्यांनी बुधवारी सरकारचा निषेध करत आपल्या 5 एकर कोबी पिकावर नांगर फिरवला. तसेच शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले नाही तर शेतकरी पुन्हा एकदा संपावर जातील असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
शेतकरी अडचणी सापडला आहे:राज्यातील कांदा, द्राक्षे यासह विविध शेतमाल पिकविणारा शेतकरी आपल्या शेतमालाला भाव मिळत नाही. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. याला कंटाळून अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. ही अतिशय दु:खाची बाब आहे. मला राज्यातील शेतकऱ्यांना सांगायचे आहे की, आपण कुठल्याही परिस्थित खचून न जाता आत्महत्या करू नये. ही परिस्थिती बघता शासनाला आपली दखल घ्यावीच लागणार आहे. शेतकऱ्यांना शासनाने योग्य ती मदत केली नाही तर सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ असे अंबादास खैरे यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांना मदत द्या:मी एक सुज्ञ युवा शेतकरी असून आपण कुठल्याही परिस्थितीत खचणार नाही. शेतकऱ्यांच्या वतीने या शासनाला शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी भाग पाडले जाईल. सरकारने शेतकऱ्यांचे दु:ख समजून घ्यावे. अन्यथा शासनाला पळता भुई थोडी करू अस युवा शेतकरी अंबादास खैरे यांनी म्हटलं आहे.
कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत:नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कधी अस्मानी कधी सुलतानी अशा दुहेरी संकटात सापडलेल्या बळीराजाला शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल भावाचा फटका बसत आहे. सध्याच्या स्थितीला हिरव्या भाजीपाल्यासाह कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्याचे जाणवत आहे. अशातच कांद्याला 2 ते 3 रुपये भाव मिळत आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे. किमान हमीभाव द्यावा अशी मागणी शेतकरी बांधवांतर्फे करण्यात येत आहे.
कांद्याच्या दरात घसरण: कधी अस्मानी कधी सुलतानी अशा दुहेरी संकटात सापडलेल्या बळीराजाला शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल भावाचा फटका बसत आहे. हिरव्या भाजीपाल्यासाह कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणावर घसरण झाली. कांद्याला 2 ते 3 रुपये व सरासरी 5 ते 6 रुपये भाव मिळत आहे. यामुळे लागवड तर सोडा वाहतुक खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. किमान हमीभाव द्यावा अशी मागणी शेतकरी बांधवांतर्फे करण्यात येत आहे.
विलासराव देशमुख यांची आठवण: विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना कांद्याचे भाव घसरले होते. नाशिक जिल्ह्यातील आमदारानी त्यावेळी सभागृहात गदारोळ करत कामकाज बंद पाडले. त्यावेळी विलासराव देशमुख यांनी 2 तासाची वेळ घेतली होती. जानेवारी ते मार्च या 3 महिन्यात विकलेल्या कांद्याला 200 रुपये अनुदान जाहीर केले, नुसते जाहीर नाही केले तर थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले. आज त्याची आठवण शेतकरी करत आहे. आम्हाला हमीभाव तर द्या, मात्र विकलेल्या कांद्याला अनुदान द्या यामुळे शेतकरी जगेल असे आवाहन करण्यात येत आहे. कांदा पिकाचे उत्पादन घेण्यासाठी एकरी किमान 50 ते 60 हजार रुपये खर्च येतो. मात्र सध्या सुरू असलेल्या भावामुळे उत्पादन शुल्क तर सोडा वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला. जर असेच सुरू असले तर करावे तरी काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
हेही वाचा:Gautam Navlakha Case : गौतम नवलखा जामीन याचिकेवर NIA विशेष न्यायालयाने चार आठवड्यात पुनर्विचार करावा - मुंबई उच्च न्यायालय