नाशिक - नांदगाव तालुक्यातील सावरगांव येथे वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बाळू नामदेव सावंत (वय, ५०) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सावंत हे सायंकाळच्या सुमारास शेतात बांधलेल्या बैलांना चारा-पाणी करण्यासाठी गेल्यावर हा प्रकार घडला.
बैलांना चारा-पाणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर काळाचा घाला, अंगावर वीज पडून मृत्यू - nandgaon
नांदगाव तालुक्यातील सावरगांव येथे वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बाळू नामदेव सावंत (वय, ५०) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
बैलजोडी निंबाच्या झाडाखाली बांधली होती. ते बैलांना चारा-पाणी करत होते. याचदरम्यान त्यांच्या अंगावर वीज पडली. यामध्ये ते गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. पावसाची वाट पाहणाऱ्या बळीराजाचा वीज पडून मृत्यू झाल्याने नांदगाव परिसरात शोककळा पसरली आहे