नाशिक- बागलाण तालुक्यातील वायगाव येथील केदा मोठाभाऊ देवरे या अल्पभूधारक शेतकऱ्याने मालेगाव तालुक्याच्या सीमेवरील कोठरे शिवारातील स्वतःच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. याचा प्राथमिक अहवाल तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनी दिला आहे.
बागलाण तालुक्यात पावसामुळे पीकाचे नुकसान, शेतकऱ्याची आत्महत्या - पीक कर्ज
बागलाण तालुक्यातील वायगाव येथील शेतकऱ्याने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. केदा मोठाभाऊ देवरे, असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.
![बागलाण तालुक्यात पावसामुळे पीकाचे नुकसान, शेतकऱ्याची आत्महत्या](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4924027-715-4924027-1572539950830.jpg)
शेतकरी केदा देवरे
केदा मोठाभाऊ देवरे यांची कोठरे शिवारात शेती असून त्यांच्यावर बँकेचे साडेतीन लाखांचे कर्ज होते. शिवाय घरातील सोने देखील गहाण होते. परतीच्या पावसाने डाळींबाच्या झाडावरील बहरलेली फुले गळून पडला. तसेच कांदा पिकाचे नुकसान झाल्याने आता कर्ज कसे फेडावे, या विवंचनेतून या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. देवरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सुन व नातवंडे असा परिवार आहे.