नाशिक- दिंडोरी तालुक्यातील म्हसोबा मंदिर भागातील कादवा रोडवर झाडाला गळफास घेवून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. काशिनाथ जीवा भोये, असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
दिंडोरीत वरखेडा शिवारात शेतमजुराची आत्महत्या - शेतमजूराची आत्महत्या बातमी नाशिक
झाडाला गळफास घेतल्याची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी जाऊन त्यांनी माहिती घेतली. काशिनाथ जीवा भोये हे भोरमाळ तालुका सुरगाणा येथील राहिवासी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
हेही वाचा-पुण्यात शिवसैनिकांचा राडा; पीक विम्याच्या पैशांसाठी फोडले विमा कंपनीचे कार्यालय
झाडाला गळफास घेतल्याची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. काशिनाथ जीवा भोये हे भोरमाळ तालुका सुरगाणा येथील राहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. काशिनाथ हा द्राक्ष मजुरांच्या टोळीत काम करत होता. घरी जायचे असे ठेकेदाराला सांगून तो कामावरुन गेला होता. मात्र, तो घरी गेलाच नाही. यादरम्यानच त्याने गळफास लावून घेतल्याचे समजते. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.