नाशिक -बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली असून, सरासरी भावात 1 क्विंटल मागे 2500 रुपयांची तर जास्तीत जास्त भावात 2635 रुपयांनी भाव कोसळले आहेत. चार दिवसांपूर्वी कांद्याला प्रति क्विंटल जास्तीत जास्त 9100 रुपये तर सरासरी 7500 रुपये इतका भाव मिळाला होता. अवघ्या 4 दिवसात भावात मोठी घसरण झाल्याचे पाहून कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
हेही वाचा -आपल्यात आता कोणतेही नाते उरले नाही... नात्यांचे तसे ओझेच होते, तेही उतरले!
नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये आज कांद्याचे भाव कोसळले. आज जास्तीत जास्त 6435 रुपये तर सरासरी 5000 रुपये इतका भाव मिळत आहे. असून आवक जास्त तर मागणी कमी असल्यामुळे भावात घसरण होत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. गेल्या चार दिवसाच्या तुलनेत आज भावात मोठी घसरण झाली असून आधीच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले असल्याने त्यातून थोड्या प्रमाणात कांद्याला चांगला भाव मिळून दोन पैसे मिळक होते. मात्र, सरकारने विदेशातून कांदा आयात करून कांद्याचे भाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.