लासलगाव (नाशिक) - लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत 550 रुपयाची घसरण झाली आहे. कांद्याला सरासरी 1750 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला असून मागील आठवड्यामध्ये कांद्याला कमाल दर 2625 रुपये भाव होता. आज (सोमवारी) कमाल 2075 रुपये दर मिळाला असल्याने 550 रुपयांची घसरण झाली आहे.
प्रतिक्रिया देताना बाजार समितीचे सचिव अनेक राज्यात कांदाच्या आवकात वाढ देशांतर्गत गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान येथील शिखर तसेच पश्चिम बंगाल येथील सुखसागर या ठिकाणी आणि लाल नवीन कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात दाखल होते. राज्यात नाशिक, अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील चाकण आणि सोलापूर या भागातही नवीन उन्हाळी कांद्याची लाल कांद्याच्या बरोबरीने आवक येत असल्याने याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजार दरावर झाला आहे.
550 रुपयांची घसरण
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कांदा बाजार आवारावर शनिवारच्या तुलनेत आज (सोमवारी) कांद्याच्या कमाल बाजारभावात साडे पाचशे रुपयांनी घसरण झाली आहे. शनिवारी कमाल 2625 रुपये, किमान 651 रुपये तर सर्वसाधारण 2100 रुपये कांद्याला प्रतिक्विंटल बाजार दर मिळाला होता. सोमवारी कांद्याची आवक वाढल्याने कमाल 2077 रुपये, किमान 900 रुपये तर सर्वसाधारण 1750 रुपये प्रतिक्विंटल बाजार दर मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. रशिया आणि यूक्रेन युद्धांचा परिणामही कांद्याच्या बाजार दर येणाऱ्या दिवसात दिसणारा आहे. कांद्याची निर्यातही कमी जरी असली तरी त्याच्यावरही परिणाम होण्याची शक्यता असल्याची चर्चा व्यापारी वर्गात होत असल्याने याकडे केंद्र सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचे लासलगाव बाजार समितीच्या सचिव सांगतात.
हेही वाचा -No War Painting Nagpur : 'युद्ध नको शांती हवी' नागपुरात चित्रकाराने पेंटिंगच्या माध्यमातून दिला संदेश