महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Fake Tiger Claws : त्र्यंबकेश्वर शहरात वन खात्याच्या छाप्यात नकली वाघ नखे, दात जप्त - रुद्राक्ष विक्रेते

त्र्यंबकेश्वर शहरात वन्यप्राणी अवयवांची तस्करी होत असल्याच्या संशयावरुन राबवलेल्या छापा सत्रात वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वाघाची नखे, दात रानडुकराचे दात, नखे, कस्तुरी यासह प्राणी पक्षी यांची नकली अवयव जप्त केले आहे. भाविकांची फसवणूक टाळण्यासाठी हा सर्व नकली साठ्यात जप्त करण्यात आला आहे.

Fake Tiger Claws
Fake Tiger Claws

By

Published : May 5, 2023, 10:51 PM IST

नाशिक :त्र्यंबकेश्वर येथील मंदिर परिसर, कुशावर्त तीर्थ चौक या ठिकाणी शंखमाळा, रुद्राक्ष विक्रेते बसतात त्यांच्याकडे वाघाचे दात, नखे, रानडुकराचे नखे, दात, कस्तुरी यासह प्राणी पक्षी यांच्या अवयाची चोरी चोरून विक्री केली जात असल्याची माहिती वन खात्याला मिळाली होती. त्यानुसार त्र्यंबकेश्वरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वन अधिकारी यांनी शोध मोहीम राबवली.

वाघनखे नकली : त्र्यंबकेश्वर येथील आठ व्यवसायांच्या दुकानांची तपासणी करण्यात आली आहे. पंचनामा करत वन्यजीवांसंदर्भातील संशयस्पद वस्तू यावेळी जप्त करण्यात आल्या आहेत. त्याची बारकाईने तपासणी केली असता त्या नकली असल्याचे निदर्शनास आले. येथील व्यवसायिकांकडून त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांची फसवणूक होऊ नये याकरिता या सर्व वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. नकली वस्तुमुळे मोठ्या प्रमाणावर भाविकांची लुबाडणुक होत होती. त्यामुळे पोलिसांनी हि कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. या शोध मोहिमेत वन अधिकारी अरुण निंबेकर यांच्या समवेत रत्ना तुपलोंढे, जिजा कनोजे, बबलू दिवे, संतोष बोडके माऊली दुरगुडे आदी कर्मचारी सहभागी झाले होते.

सुखलाल चांदवडकर यांच्या विरोधात गुन्हा : काही महिन्यांपूर्वी नाशिकच्या वन विभाग पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती, या माहितीच्या आधारे पथकाने खात्री पटवल्या नंतर वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांच्या पथकाने नाशिक शहराच्या रविवार कारंजा बाजारपेठेतील सुखलाल चांदवडकर यांच्या दुकानात छापा टाकला होता. या दुकानात झडती करतांना बाटल्यांमध्ये वन्यप्राण्यांचे अवयव, वन कर्मचाऱ्यांना मिळून आले. याप्रमाणे याप्रकरणी सुखलाल चांदवडकर यांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या विविध कलमान्वये वनक्षेत्रपाल नाशिक यांच्या कार्यालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी सर्व नकली साठा जप्त केला आहे.

  • हेही वाचा -

ABOUT THE AUTHOR

...view details