महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मांजरपाडा प्रकल्पामुळे येवला तालुक्यापुढील कायम दुष्काळी असलेला शब्द पुसला जाणार - छगन भुजबळ

येवला तालुका हा महाराष्ट्रातील सर्वात दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र, येवल्याचा दुष्काळ दूर करण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ड्रीम प्रोजेक्ट आखला होता. रविवारी मांजरापाडा प्रकल्पाचे उद्धाटन भुजबाळ यांच्या हस्ते झाले.

मांजरापाडा प्रकल्पाचे उद्धाटन

By

Published : Sep 29, 2019, 11:50 PM IST

नाशिक - येवला तालुका हा महाराष्ट्रातील सर्वात दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र येवल्याचा दुष्काळ दूर करण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ड्रीम प्रोजेक्ट आखला होता. रविवारी या प्रकल्पाचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी भुजबळ म्हणाले, मी पाहिलेले मांजरपाड्याचे स्वप्न आज पूर्ण झाले असून यामुळे येवला तालुक्याच्या नावापुढे कायम दुष्काळी असलेला शब्द पुसला जाणार आहे. मांजरपाडा प्रकल्प पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

मांजरापाडा प्रकल्पाचे उद्धाटन

हेही वाचा - भोकरमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अशोक चव्हाणांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

भुजबळ म्हणाले, पुणेगाव दरसवाडी कालव्याच्या संदर्भात ४४ वर्षांपूर्वी ज्यांनी ज्यांनी या प्रकल्पाबाबत प्रयत्न केले मी त्यांचा मनापासून आभारी आहे. माजी आमदार दिवंगत जनार्दन पाटील यांनी रोजगार हमी कालव्याची निर्मिती केली. मात्र पुढे या कालव्याचे काम झाले नाही. त्यानंतर मतदारसंघात आल्यानंतर याबाबत माहिती घेतली. यासाठी अनेक नागरिकांनी आंदोलने केले आणि घाम गाळला होता.

हेही वाचा - पंतप्रधान चुकीचं बोलले.. भारताने जगाला बुद्ध दिला पण उपयोगाचा नाही - संभाजी भिडे

मांजरपाड्याचे पाणी तीन वर्षांपूर्वीच येवल्याला मिळाले असते. मात्र, आघाडी सरकारच्या काळात ७० कोटी रुपये ठेवले असताना सुधारीत प्रशासकीय मान्यतेच्या नावाखाली सरकारने हे काम रखडून ठेवले असल्याचे भुजबळ यावेळी म्हणाले. त्यासाठी कारागृहातूनसुद्धा पाठपुरावा केला. गुजरातला पाणी नेऊ देऊ नका यासाठी सरकारकडे आपली बाजू मांडली. नार पारच्या पाण्यातून केवळ उत्तर महाराष्ट्र नाही तर मराठवाडा देखील सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी परिसरातील शेतकरी बांधवांनी वाद्याच्या तालावर ठेकाही धरला. समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ हेही यात सामील झाले. दरम्यान, तालुक्यातील विविध गावागावातील शेतकऱ्यांनी भुजबळांचा सत्कार केला. गेल्या ४४ वर्षानंतर गावात पाणी आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. कातरणी विखरणी इत्यादी गावांमध्ये यावेळी गुढ्या उभारण्यात आल्या होत्या.

हेही वाचा - सरकारचा कांदा निर्यातबंदीचा निर्णय म्हणजे शेतकऱ्याला मातीत घालण्याचे षडयंत्र - डॉ. अजित नवले

ABOUT THE AUTHOR

...view details