नाशिक: द्राक्षाची पंढरी म्हणून नाशिकची ओळख आहे. दरवर्षी लाखो टन द्राक्ष निर्यात होत असतात. यातून कोट्यावधीचे परकीय चलन भारताला मिळाले आहे. यंदा नाशिक जिल्ह्यात 62 हजार 982 हेक्टर क्षेत्रावर द्राक्षांची लागवड केली गेली. यात दिंडोरी, निफाड, नाशिक हे तालुके द्राक्ष उत्पादनात अग्रेसर आहेत. विशेष म्हणजे राज्यातील 91 टक्के द्राक्ष निर्यात एकट्या नाशिक जिल्ह्यातून होते. यंदा तर नववर्षाच्या पहिल्या दहा दिवसात एकट्या युरोप खंडामध्ये नाशिक जिल्ह्यातून 197 मेट्रिक टन द्राक्ष रवाना झाली होती. त्यानंतर आता दीड महिन्यात युरोप खंडात आतापर्यंत जवळपास 25 हजार मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहे. त्यात नेदरलँड या देशांमध्ये सर्वाधिक 20 हजार मेट्रिक टन तर सर्वांत कमी ऑस्ट्रिया या देशात 13 टन द्राक्ष निर्यात झाली आहे.
'या' देशात होते द्राक्षांची निर्यात:युरोपियन खंडातील जर्मनी, नेदरलँड, बेल्जियम ,युके आणि डेन्मार्क हे द्राक्षाची आयात करणारे मुख्य देशात, युरोपो वगळता इतर खंडाचा विचार केला तर रशिया,कॅनडा ,तुर्की आणि चीन या देशातून द्राक्षांना मोठी मागणी असून येथेही मोठ्या प्रमाणावर द्राक्षांची निर्यात झाली आहे,15 फेब्रुवारी नंतर निर्यातीचा खरा काळा सुरू झाला असून द्राक्षाला योग्य दर मिळावा यात घसरण होऊ नये अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतात.
निर्यातक्षम द्राक्ष:
महाराष्ट्रातून होणाऱ्या निर्यातक्षम द्राक्षांमध्ये --
1) हिरवे द्राक्ष: सोनाका, थामसन सीडलेस, माणिक चमन, सुपर सोनाका, तास- ए -गणेश
2) रंगीत द्राक्ष:शरद सीडलेस, क्रीमसन सीडलेस, फ्लेम सिडलेस, रेड ग्लोब, मेडिका