महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Malegaon Corona Control : मालेगावात कोरोना नियंत्रणात कसा? आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून 40 तज्ज्ञांचे पथक घेणार आढावा

कोरोनाच्या सुरुवातीच्या दोन लाटेत मालेगाव (Malegoan) हे कोरोनाचे हॉटस्पॉट (Malegaon Corona Hotspot) होते. मात्र तिसर्‍या लाटेत (Third Wave) कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत असताना मालेगाव याला अपवाद आहे. याची शास्त्रीय कारणमीमांसा करण्यासाठी नाशिक आरोग्य विज्ञान विद्यापीठाने (University of Health Science Nashik) संशोधन मोहीम हाती घेतली आहे.

corona
फाईल फोटो

By

Published : Jan 13, 2022, 8:44 PM IST

Updated : Jan 13, 2022, 10:40 PM IST

नाशिक - जिल्ह्यातील मालेगाव पहिल्या लाटेत कोरोनाचे हॉटस्पॉट (Malegaon Corona Hotspot) ठरले, दुसऱ्या लाटेतही (Second Wave) रुग्ण संख्या वाढली. मात्र तिसर्‍या लाटेत (Third Wave) देशात आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत असताना मालेगाव याला अपवाद आहे. याची शास्त्रीय कारणमीमांसा करण्यासाठी नाशिक आरोग्य विज्ञान विद्यापीठाने (University of Health Science Nashik) संशोधन मोहीम हाती घेतली आहे. मालेगाव महापालिका आरोग्य यंत्रणेच्या मदतीने विद्यापीठाने निवृत्त 40 तज्ज्ञांचे पथक यासाठी सर्वेक्षण करणार आहे. यानंतर पंधरा दिवसात निकष हाती येण्याचा अंदाज आहे.

माहिती देताना जिल्हाधिकारी आणि कुलगुरु

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर व जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात झालेल्या चर्चेत मालेगाव मॅजिकवर शास्त्रीय संशोधन संकल्पना समोर आली. मालेगावात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्पात हजारो नागरिक संक्रमित झाले होते. मात्र, आता तिसर्‍या लाटेत सर्वत्र मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असताना मालेगावात केवळ 27 रुग्ण उपचार घेत आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णांची टक्केवारी कमी कशी आहे याचे सर्वांनाच कुतूहल आहे. नागरिकांनी कोरोनावर मात करताना नेमकी कोणती जीवनशैली वापरली? त्याचा शास्त्रीय अभ्यास करणे हा मालेगाव मॅजिक अभियानाचा उद्देश आहे. जगभर व आपल्या देशातही कोरोनावर मात करण्यासाठी संशोधनात्मक प्रयत्न सुरू आहेत. त्याचे उत्तर मालेगावात दडले आहे ते शोधण्याची गरज आहे. मालेगाव पॅटर्नवर तज्ज्ञांकडून शास्त्रीय कारणमीमांसा पण झाली पाहिजे असे सर्वांना वाटत आहे.

  • आरोग्य विद्यापीठात पेपर सादर केले जातील -

आरोग्य विज्ञान विद्यापीठासोबत चर्चा झाली असून, यावर निर्णय झाला आहे. त्यांनी याचा अभ्यास करून संशोधन पेपर जागतिक स्तरावर व देशातील आरोग्य विद्यापीठांमध्ये प्रकाशित केले जातील. मालेगाव पॅटर्न कसा आहे हे या संशोधनातून कोरोनावर मात करण्यासाठीचे उत्तर मिळेल, असा दावा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केला आहे.

  • अँटीबॉडी तपासणार -

कोरोना नियंत्रण कार्याचा अभ्यास वैद्यकीय तज्ज्ञांची टीम करणार आहे. येथील जीवनशैली, लसीकरण झाले की नाही? कोरोना संक्रमणात झालेले उपचार, परिसर अभ्यास, नागरिकांचे वर्तन, त्यांची हिम्मत कशी वाढली यावर एक प्रश्नावली भरून घेतली जाईल. तसेच 2500 व्यक्तींचे अँटीबॉडी तपासण्यासाठी रक्ताचे नमुने घेतले जातील. कॉलेजचे तज्ज्ञ या अभियानात भाग घेणार असल्याचे डॉ. माधुरी कानिटकर यांनी सांगितले सांगितले आहे.

Last Updated : Jan 13, 2022, 10:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details