महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकमध्ये मुस्लिम कुटुंबाकडून एकात्मतेचे दर्शन; दिवाळीनिमित्त गरीब मुलांना दिले खाऊ - Nashik Muslim family visits poor children

शहरात सामाजिक एकात्मतेचे दर्शन बघायला मिळाला आहे. रंगरेज या मुस्लिम कुटुंबानी रस्त्यावर राहणाऱ्या मुलांची दिवाळी गोड व्हावी म्हणून स्वखर्चाने मुलांना खाऊ, फटाके भेट म्हणून दिले आहे. यावेळी गरीब मुलांच्या चेहऱ्यावर आनंद मावेनासा झाला होता.

नाशिकमध्ये मुस्लिम कुटुंबाकडून एकात्मतेचे दर्शन

By

Published : Oct 28, 2019, 5:30 PM IST

नाशिक- शहरात सामाजिक एकात्मतेचे दर्शन बघायला मिळाला आहे. रंगरेज या मुस्लिम कुटुंबानी रस्त्यावर राहणाऱ्या मुलांची दिवाळी गोड व्हावी म्हणून स्वखर्चाने मुलांना खाऊ,फटाके भेट म्हणून दिले आहे. यावेळी गरीब मुलांच्या चेहऱ्यावर आनंद मावेनासा झाला होता.

एकीकडे देशात जातीपातीला खतपाणी घालणारे प्रकार वारंवार समोर येत आहे. मात्र, असे असताना दुसरीकडे जुन्या नाशिक भागात राहणारे रंगरेज या मुस्लिम कुटुंबाने स्वखर्चाने दिवाळी फटाके, लाडू आणून शहरातील महामार्गाच्या कडेला राहणाऱ्या गोर गरीब, निराधार मुला-मुलींना वाटप करत दिवाळी साजरी केली आहे. या कार्यातून त्यांनी देशातील लोकांना एकात्मतेचे संदेश दिले आहे. दस्तगीर रंगरेज हे एका खाजगी कंपनीत काम करतात. दस्तगीर आणि त्यांची पत्नी गुड्डी रंगरेज यांनी पुढाकार घेत हा उपक्रम केला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या उपक्रमामुळे रंगरेज कुटुंबाचा सर्वत्र कौतुक होते आहे.

रंगरेज कुटुंबाने शहरातील द्वारका, टाकळी रोड, मुंबई नाका, कन्नमवार पूल आदी भागातील महामार्ग लगत रस्त्यावर राहणाऱ्या कुटुंबातील लहान मुलांना खाऊचे तसच लाडूचे वाटप केले. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद मावेनासा झाला होता. जातीपातीची बंधने न ठेवता आम्ही समाजसेवा करीत असतो, गरीब निराधार मुला-मुलींना दिवाळीचा भरपूर आनंद घेता यावा, म्हणून आम्ही विविध ठिकाणी जाऊन त्यांना मिठाई ,फटाके दिले. यावेळी गरीब मुलांच्या चेहऱ्यावरील आनंदच आम्हाला समाधान देणारे होते, असे रंगरेज कुटुंबांनी सांगितले.

हेही वाचा-चोरी झालेले मंगळसूत्र लक्ष्मीपूजनला महिलेस मिळाले परत; नांदगाव पोलिसांची कामगिरी

ABOUT THE AUTHOR

...view details