नाशिक - जिल्हा हा कांद्याची मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. नाशिकमधून दरवर्षी लाखो टन कांदा निर्यात होत असतो. यंदाच्या वर्षी केंद्र सरकारने कांद्याचे भाव स्थिर ठेवण्यासाठी तातडीने निर्यातबंदीचा निर्णय घेतला. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक होत ठिकठिकाणी आंदोलन करून निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी केली. मात्र, असे असले तरी आज (दि. 30 सप्टें.) नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीत कांदा हा 3 ते 5 हजार रुपये क्विंटल दराने विकला जात आहे. निर्यातबंदीपूर्वी हा भाव दोन ते अडीच हजार रुपये क्विंटल इतका होता.
- ... आणखी वाढू शकतो कांद्याचा भाव
नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे सध्या कांदा चाळीत 25 ते 30 टक्के कांदा शिल्लक असून यातील बहुतांश कांदा हा खराब झाला आहे. त्यामुळे बाजार समितीत कांद्याची आवक कमी झाली आहे. मागणी जास्त आणि आवक कमी असल्याने कांद्याचे भाव वाढले आहे. अशात सप्टेंबर महिन्यात येणारा लाल कांदाही अतिपावसामुळे खराब झाला असून हा कांदा अद्याप बाजारात दाखल झाला नसल्याने उन्हाळी कांद्याचे भाव वाढले आहे. पुढील दीड ते दोन महिने कांद्याचे भाव अधिक वाढू शकतात, असा अंदाज कांदा व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
- निर्यात बंदी करून काय साध्य झालं?
सरकारने कांद्याचे भाव स्थिर ठेवण्यासाठी आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी तातडीने कांद्याची निर्यात ॉबंदी केली. मात्र, असे असले तरी शेतकऱ्यांकडे साठवूण ठेवलेला कांदा अत्यपल्प प्रमाणत असल्याने बहुतांशी कांदा खराब झाला आहे. त्यामुळे कांद्याची आवक कमी झाली असून कांद्याचे भाव वाढले आहेत. यामुळे कांद्या निर्यातबंदी करुन काय साध्य झाले, असा सवाल व्यापारी व शेतकरी करत आहेत.
- टाळेबंदीच्या काळात आम्ही कवडी मोल भावात कांदा विकला