महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'ईटीव्ही भारत'च्या वृत्ताने टोल कंपनीला आली जाग; इंदूर पुणे मार्गावर डागडुजीला सुरुवात - ईटीव्ही भारत वृत्ताने टोल कंपनिला आली जाग

मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर पुणे महामार्गावर पडलेले खड्डे आणि टोल कंपनीकडून सुरू असलेली 'टोलधाड' याबाबत 'ईटीव्ही भारत'ने मंगळवारी वृत्त प्रकाशित करुन सार्वजनिक बांधकाम विभागासह टोल कंपनीला जाग आणली. आमच्या वृत्ताची दखल घेत मंगळवारी 'एमएमकेपीएल' या कंपनीने या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांची डागडुजी सुरू केली आहे.

'ईटीव्ही भारत'च्या वृत्ताने टोल कंपनीला आली जाग

By

Published : Nov 6, 2019, 1:50 PM IST

नाशिक - मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर पुणे महामार्गावर पडलेले खड्डे आणि टोल कंपनीकडून सुरू असलेली 'टोलधाड' याबाबत 'ईटीव्ही भारत'ने मंगळवारी वृत्त प्रकाशित करुन सार्वजनिक बांधकाम विभागासह टोल कंपनीला जाग आणली. आमच्या वृत्ताची दखल घेत मंगळवारी 'एमएमकेपीएल' या कंपनीने या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांची डागडुजी सुरू केली आहे.

'ईटीव्ही भारत'च्या वृत्ताने टोल कंपनीला आली जाग

हे ते वृत्त होते ज्यामुळे कार्यवाही सुरू करण्यात आली -

इंदूर-पुणे महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य, टोलकंपन्यांकडून 'टोलधाड' सुरूच

इंदूर पुणे महामार्गावरील मालेगाव ते कोपरगाव या बीओटी तत्वावरील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने मंगळवारी सकाळी वृत्त प्रकाशित केले होते. यात नागरिकांना होणारा त्रास व जनतेचा रोष प्रशासनासमोर आणला. याची तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभाग व एमएमकेपीएल कंपनीने दखल घेत मंगळवारी दुपारी रस्त्यांची डागडुजी सुरू केली आहे.

मनमाड शहरातील रेल्वे ओव्हरब्रिजवर सर्वात जास्त खड्डे होते. या खड्ड्यामुळे अनेक अपघात झालेले आहेत त्याठिकाणी सर्वात आधी डागडुजी सुरू करण्यात आली आहे. तत्काळ यंत्रणा राबवून खड्डयाना बुजवण्याचे काम सध्या सुरू आहे. सुरू असलेल्या कामाबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले तरी कायमस्वरूपी या त्रासातून मुक्तता मिळावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

इंदूर पुणे हा राज्यमहामार्ग मनमाड शहारातून जातो. यावर मोठ्या प्रमाणात रहदारी आहे त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर खराब होतो यासाठी यावर कायमस्वरूपी उपाय करावा. तसेच मनमाड शहरातून जाणारा रस्ता बंद करून बायपास करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.

हेही वाचा - नाशिक-पुणे महामार्गावर मनसेचे खड्ड्यांभोवती दिवे लावून आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details