नाशिक- जिल्ह्यात अनेक भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. मागील अनेक दिवसापासून नाशिकमध्ये पारा ३८ ते ४० अंशावर होता. तापमानात सतत वाढ होत असल्यामुळे नागरिकही चांगलेच हैराण झाले होते. दरम्यान, या अवकाळी पावसामुळे काही काळ आता वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र, या अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
विजांच्या कडकडाटासह नाशकात अवकाळी पाऊस - चांदवड
हवामान खात्याकडून अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, दुपारपासून कडाक्याचे ऊन असल्याने नागरिकांना पावसाची कुठलीही चाहूल नसल्याचे दिसून येत होते. परंतु, सायंकाळी अचानक विजांच्या कडकडाटासह नाशिक जिल्ह्यात पाऊस पडला. येवला, चांदवड, मनमाड, नांदगाव तसेच कळवण, त्रंबकेश्वर आणि इगतपुरी या तालुक्यातील काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह सायंकाळी जोरदार पाऊस झाला.

अचानक झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली. मागील २ दिवसांपासून नाशिक जिल्ह्याच्या काही भागांत अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे कांदा व द्राक्ष पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसामुळे जाण्याची शक्यता आहे.