महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकमध्ये उद्योजकाची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या - उद्योजकाची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या

दुपारच्या सुमारास नाशिककडे निघाले होते. ते ताहाराबाद रोडवरील यशवंतनगर जवळ आले. त्यावेळी त्यांचे मावसभावाशी बोलणे झाले. माझी गाडी चालवण्याची परिस्थिती नसून, मी सटाणा जवळील जोगेश्वरी फर्टिलायझर्स समोर उभा आहे, असे त्यांनी मावसभावाला मोबाईलवर संपर्क साधत सांगितले. शिंदे यांचा मावसभाऊ व इतर दोन नातेवाईक घटनास्थळी आले. त्यांना नंदलाल शिंदे आपल्या स्कोडा कारमध्ये ड्रायव्हर सीटवर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले.

नाशिक उद्योजक
नाशिक उद्योजक

By

Published : Apr 7, 2021, 9:57 PM IST

नाशिक -सटाणा शहरानजीक असलेल्या जोगेश्वरी फर्टिलायझर्स या दुकाना समोरील हायवेवर एका उद्योजकाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. नंदलाल गणपत शिंदे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना आज (बुधवार) घडली आहे. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. या संपूर्ण घटनेचा तपास सटाणा पोलीस करत आहे.

नाशिक आत्महत्या


पोलीस तपास सुरू
पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, नंदलाल शिंदे रा.नाशिक (एमएच 15-एफटी-0133) या कारमधून सामोडे येथून दुपारच्या सुमारास नाशिककडे निघाले होते. ते ताहाराबाद रोडवरील यशवंतनगर जवळ आले. त्यावेळी त्यांचे मावसभावाशी बोलणे झाले. माझी गाडी चालवण्याची परिस्थिती नसून, मी सटाणा जवळील जोगेश्वरी फर्टिलायझर्स समोर उभा आहे, असे त्यांनी मावसभावाला मोबाईलवर संपर्क साधत सांगितले. शिंदे यांचा मावसभाऊ व इतर दोन नातेवाईक घटनास्थळी आले असता, त्यांना नंदलाल शिंदे आपल्या स्कोडा कारमध्ये ड्रायव्हर सीटवर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्रथम रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतली आहे. शिवाय घटनास्थळी रुग्णवाहिकेला पाचारण करून शिंदे यांचा मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास सटाणा पोलिसांनी करत आहे.

हेही वाचा-कुर्ला परिसरातील भंगार दुकानाला आग, अग्निशामक दलाच्या चार गाड्या दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details