महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीपीसीएलच्या खासगीकरणाविरोधात कर्मचाऱ्यांचे आंदोलन, इंधन पुरवठा ठप्प - बीपीसीएलच्या खासगीकरणाविरोधात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

केंद्र सरकारच्या खासगीकरण धोरणाचा फटका अनेकांना बसत आहे. केंद्र सरकार एयर इंडिया, बीएसएनएल पाठोपाठ आता भारत पेट्रोलियम कंपनीचे देखील खासगीकरण करणार आहे. याचा मोठा फटका कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसणार असल्याचे कारण देत देशभरात भारत पेट्रोलियम कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन केले.

agitated against BPCL privatization
बीपीसीएलच्या खासगीकरणाविरोधात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By

Published : Nov 29, 2019, 11:55 AM IST

नाशिक -केंद्र सरकारने सुरू केलेल्या खासगीकरणाविरोधात भारत पेट्रोलियम कंपनीच्या मनमाड येथील पानेवाडी इंधन प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी आज रस्त्यावर उतरून काम बंद आंदोलन केले. या आंदोलनामुळे प्रकल्पातील 400 टँकरच्या माध्यमातून राज्यात होणारा इंधन पुरवठा ठप्प झाला. त्यामुळे इंधन टंचाई होण्याची शक्यता आहे.

बीपीसीएलच्या खासगीकरणाविरोधात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

केंद्र सरकारच्या खासगीकरण धोरणाचा फटका अनेकांना बसत आहे. केंद्र सरकार एयर इंडिया, बीएसएनएल पाठोपाठ आता भारत पेट्रोलियम कंपनीचे देखील खासगीकरण करणार आहे. याचा मोठा फटका कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसणार असल्याचे कारण देत देशभरात भारत पेट्रोलियम कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन केले.

या आंदोलनाचा मोठा फटका बसला असून जवळपास 400 च्या वर टँकर बंद आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रासह इतर मराठवाडा विभागात आज इंधन पुरवठा होणार नसल्याने मोठ्या प्रमाणात टंचाई होऊ शकते. भारत सरकारने जो काही खासगीकरण करण्याचा डाव आखला आहे, तो आम्ही हाणून पाडू. तसेच वेळ आली तर रस्त्यावर उतरू. मात्र, भारत पेट्रोलियमचे खासगीकरण होऊ देणार नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. या संपात जवळपास 41 कायम कर्मचारी, 150 कंत्राटी तसेच 400 वाहक व चालक, असे लोक सहभागी झाले होते. जवळपास 17 विविध कामगार संघटनानी या संपास पाठिंबा जाहीर केला आहे.

हे वाचलं का? - 'बीपीसीएल' कंपनीच्या खासगीकरण विरोधात कर्मचाऱ्यांचा चेंबूरमध्ये मोर्चा

'मोदी सरकार हाय हाय' अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात सर्व कर्मचारी सहभागी झाले असल्याने राज्यभरात आज इंधन टंचाई होण्याची शक्यता आहे. आज सुमारे 400 टँकर बंद ठेवण्यात आले होते. केंद्र सरकारने त्वरीत हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी संपकरी कर्मचाऱ्यांनी केली आहे. अन्यथा यापेक्षा मोठे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details