महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वासो संस्थेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा 1 ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा

वासो संस्थेत काम करणाऱ्या राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांकडे  शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 1 ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

वासो संस्थेतील कंञाटी कर्मचाऱ्यांचा 1 ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा

By

Published : Jul 28, 2019, 10:36 PM IST

नाशिक -वासो संस्थेत काम करणाऱ्या राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 1 ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

स्वच्छतेची चळवळ ग्रामीण भागातून राबवण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाअंतर्गत वासो (पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था)मार्फत प्रत्येक जिल्हा परिषद व पंचायत समितीत गटसंसाधन केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. यात कंत्राटी तत्वावर काम करणारे गटसमन्वयक व समूह समन्वयक आठ हजार रुपये मानधनावर काम करतात.

गेल्या सात वर्षांपासून घनकचरा व्यवस्थापन, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, स्वच्छ सर्वेक्षण मोहीम, शौचालय वापराबाबत जनजागृती, स्वच्छता दर्पण असे विविध उपक्रम कर्मचारी यशस्वीपणे राबवत असताना शासन मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कर्मचारी करत आहेत.

यासंबंधी जिल्हापरिषद अध्यक्ष, मुख्यकार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी आणि पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी ईशादिन शेळकंदे यांना कर्मचाऱ्यांनी निवेदन देऊन मागण्यांसंदर्भात प्रशासन स्तरावर पाठपुरावा करावा अशी मागणी केली आहे. यावेळी, जिल्ह्यातील संघटनेचे सचिव वैभव पाटील, गणेश सरोदे, मोहन वाघ, संदीप पवार, माधव शेळके आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details