महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shinde Fadnavis Government : 'राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार 'या' महिन्यात कोसळणार' - MP Sanjay Raut on visit to Nashik

फेब्रुवारीमध्ये राज्यात शिंदे-फडणवीस सरकार ( Shinde government will collapse in February ) पडेल असे भाकित शिवसेना खासदार संजय राऊत ( Shiv Sena MP Sanjay Raut ) यांनी केले आहे. ते आज नाशिक येथे बोलत होते. राज्यात कायद्याचे राज्य असून, १६ आमदारांचे निलंबन शंभर टक्के होणार असल्याचेही ते ( Shinde Fadnavis Govt ) म्हणाले.

Shinde-Fadnavis government
शिंदे-फडणवीस सरकार

By

Published : Jan 7, 2023, 5:38 PM IST

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार

नाशिक - राज्यातील एकनाथ शिंदे-फडणवीस सरकार ( Shinde Fadnavis Govt ) फेब्रुवारी महिन्यात केसळणार असल्याची भविष्यवाणी ( Shinde government will collapse in February ) शिवसेना खासदार संजय राऊत ( Shiv Sena MP Sanjay Raut ) यांनी केली आहे. ते आज नाशिकमध्ये बोलत होते. मुख्यमंत्र्यांसह ६ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होऊनही कोणतीही कार्यवाही होत नाही. राज्यात कायद्याचे राज्य असून, १६ आमदारांचे निलंबन कायद्याच्या चौकटीतून १०० टक्के होणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात अर्थात फ्रेबुवारीत राज्य सरकार पडणारअसल्याचे भाकीत शिवसेनेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी नाशिकमध्ये केले आहे.

संजय राऊत यांची नाशिकमध्ये जोरदार फटकेबाजी

राऊत नाशिक दौऱ्यावर - खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर ( MP Sanjay Raut on visit to Nashik ) असून नाशिकमध्ये आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन वेळी बोलताना ते म्हणाले की माझा क्रिकेटचा तसा संबंध नाही, हीच पोर उद्या भगवा खांद्यावर घेणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला,खेळाडू वृत्ती राजकारणातून कमी होत चालली आहे, बाळासाहेबांना राजकारणात अशीच खेळाडू वृत्ती अपेक्षित होती. मैदानात चांगली फटकेबाजी करत जा. मला तुम्ही कायम धुलाई करायला बोलतात, हे छोटे मैदान आहे, पुढे आपल्याला मोठ्या मैदानात लढायचा आहे, अस संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटल.

राऊत यांची बॅटिंग - नाशिकमध्ये राऊत यांनी क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन केल्यानंतर बॅटिंग करण्याचा आनंद घेतला. त्यांची राजकीय फटकेबाजी तर सर्वांनीच अनुभवली आहे. दरम्यान क्रिकेटच्या मैदानातील त्यांची फटकेबाजी नाशिककारांना अनुभवयाला मिळाली. त्यांनी राजकीय मैदानाप्रमाणे क्रिकेटच्या मैदानात ही बॅटिंग करत फटकेबाजी केली.

डॅमेज कंट्रोल करणार -शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत त्यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडणार आहे. काही दिवसापासून ठाकरे गटातून आउटगोइंग सुरू असल्याने संजय राऊत हे आज पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच फेब्रुवारीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर देखील ते पूर्व तयारीचा आढावा घेणार आहे.

यांनी केला शिवसेनेला जय महाराष्ट्र -दोन दिवसांपूर्वी नाशिक ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकारी यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला आहे. यात पूर्व विधानसभा प्रमुख योगेश बेलदार, शहर संघटक अनिल साळुंखे, महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना महाराष्ट्र उपसचिव बापू लहूजी ताकाटे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेला रामराम केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details