नाशिक- एकनाथ खडसे शिवसेनेत येणार की, नाही हा निर्णय पक्षप्रमुखांचा असल्याची प्रतिक्रिया मंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये दिली आहे. एकनाथ खडसे नाराज असून ते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य कॅबीनेट मंत्री गुलाबराव देवकर यांनी केले होते.
मंत्री दादा भुसे यांची प्रतिक्रिया हेही वाचा - 'देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांनीच माझे तिकीट कापले'
दरम्यान, गुलाबराव पाटील हे मंत्री असून एक जबाबदार नेते आहेत. त्यामुळे ते बोलत असतील तर त्या बोलण्यात नक्कीच तथ्य आहे. मात्र, यावर मी प्रतिक्रिया देणार नसून हा अधिकार वरिष्ठांचा असल्याचे मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
मंत्री झाल्यानंतर दादा भुसे आज पहिल्यांदाच नाशिकमध्ये आले होते. यावेळी शिवसैनिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. आज नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक आहे.