दिवाळीनंतर खाद्यतेलाच्या किमतींचा भडका, आयात शुल्कात मोठी वाढ - Edible oil prices nashik
दैनंदिन जीवनात गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सगळ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या खाद्य तेलाचे दर भडकल्याने सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. दिवाळीत केंद्र सरकारकडून तेलाच्या आयात शुल्कात मोठी वाढ केल्याने तेलाच्या किंमती वाढल्या असल्याचे काही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
नाशिक
By
Published : Jan 5, 2021, 8:07 PM IST
नाशिक- दिवाळीनंतर खाद्यतेलाच्या किंमती वाढल्या असून ह्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या किराण्याचे बजेट कोलमडले आहे. केंद्र सरकारकडून तेलावर आकारण्यात येणारे आयात शुल्क 4 टक्क्यांवरून थेट 23 टक्के आकारण्यात येत असल्याने तसेच भारतात तेलाचा पुरवठा करणाऱ्या मलेशिया आणि युक्रेन देशात पूर आणि इतर समस्या निर्माण झाल्याने तेलाच्या किंमती वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
नाशिक
दैनंदिन जीवनात गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सगळ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या खाद्य तेलाचे दर भडकल्याने सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. दिवाळीत केंद्र सरकारकडून तेलाच्या आयात शुल्कात मोठी वाढ केल्याने तेलाच्या किंमती वाढल्या असल्याचे काही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारकडून आयात शुल्क 4 टक्क्यांवरून थेट 23 टक्के केल्याने तेलाच्या किंमती वाढल्या आहेत.
मलेशियात कंटेनर अडकले
भारतात केवळ 20 टक्के तेलाची निर्मिती होत असून 80 टक्के तेल हे मलेशिया आणि युक्रेनमधून भारतात येत असते. मलेशिया देशातून मोठ्या प्रमाणात भारतात सोयाबीन तेलाची आयात केली जाते. मात्र, मागील काही दिवसांपासून मलेशियात संघर्ष सुरू असल्याने तेलाचे अनेक कंटेनर अडकून पडले आहेत. तसेच युक्रेन देशातून सूर्यफुलाच्या तेलाची आयत केली जाते मात्र तेथेही पुराची स्थिती असल्याने तेलाचा पुरवठा भारतात होत नसल्याने तेलाच्या किंमती वाढल्याचे नाशिकचे प्रसिध्द व्यापारी प्रफुल्ल संचेती यांचे म्हणणे आहे.
लग्नसराईमुळे वाढली तेलाची मागणी
विदेशात आयात होणाऱ्या खाद्यतेलाचे प्रमाणात रोडावल्याने बाजारात तेलाचे दर वाढले आहेत. त्यात आता लग्नसराई आणि हॉटेलदेखील पूर्वपदावर येत असल्याने तेलाची मागणी वाढली आहे. दिवाळीपूर्वी मिळणारे सोयाबीन तेल 100 रुपायांवरून आता थेट 138 रुपये प्रति लिटरवर गेले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसत आहे.
महिन्याचे बजेट कोलमडले
आधीच कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, पगार कपात झाली, अशात महागाई वाढत आहे. तेलाच्या किमतीत 25 ते 30 रुपये लिटर मागे वाढ झाली आहे. त्यामुळे आमचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. सरकारने तेलाच्या किमतीवर नियंत्रण ठेऊन किंमती नियंत्रणात आणायला पाहिजे, असे मत गृहिणी दीप्ती चिटणीस यांनी व्यक्त केले.