येवला (नाशिक) - लॉकडाऊनमुळे विविध क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमध्ये आठवडी बाजार व सर्व भाजीमंड्या ह्या बंद आहेत. याचा फटका आता येवल्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला आहे. मिरची विक्री होत नसल्या कारणाने मिरची शेतातच पडून आहे. लॉकडाऊनमुळे मोठा आर्थिक फटका बसण्याच्या भितीने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सकाळी अकरा वाजेपर्यंत शेतमाल विकण्यास परवानगी असल्याने कमी वेळात मिरची विक्री होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील अजून निघाला नसून मिरची विकली जात नसल्याने ती शेतातच पडून आहे. तर विक्री होत नसल्याने मिरची झाडावरच लाल होत आहे. तरी शेतमाल विक्रीला वेळ मर्यादा वाढवून द्यावी अशी मागणी येवल्यातील शेतकरी करीत आहे.
खरीप पेरणी करता भांडवल उभे करण्याचा प्रश्न -