येवला (नाशिक) - येवल्यात पिंपळगाव जलाल टोल नाक्यावर शहर पोलिसांकडून ई-पास तपासणी करण्यात येत आहे. येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल टोल नाका येथे येवला शहर पोलिसांकडून नाकेबंदी करण्यात आली असून यावेळी इतर जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांची ई-पास तपासणी करण्यात येत आहे.
ई-पास नसणाऱ्यांना माघारी जाण्याची वेळ -
येवल्यात पिंपळगाव जलाल टोल नाक्यावर शहर पोलिसांकडून ई-पास तपासणी - नाशिक ई-पास
येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल टोल नाका येथे येवला शहर पोलिसांकडून नाकेबंदी करण्यात आली असून यावेळी इतर जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांची ई-पास तपासणी करण्यात येत आहे.
कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने जिल्हा बंदी लागू केली असल्याने नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या मध्यावर असलेल्या येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल टोल नाका येथे येवला शहर पोलिसांकडून नाकेबंदी करण्यात आली असून यावेळी इतर जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांची ई-पास तपासणी करण्यात येत असून यावेळी ज्यांच्याकडे ई पास नाही. अशा गाड्यांना माघारी पाठवण्यात येत आहे.
तसेच बुधवार दिनांक 19 मे 2021 पासून येणाऱ्या वाहनांमधील नागरिकांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी दिली आहे.